सातारा : जिल्हा न्यायालय बॉम्बने उडवून देण्याचा ई-मेल आल्यानंतर मंगळवारी सातार्यातीलच एका हॉटेलवर दहशतवादी हल्ला होणार असल्याचे पत्र आल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम राबवत तपास केला असता संशयित फलटण तालुक्यातील असल्याचे समोर येत आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती..याबाबत अधिक माहिती अशी, शहरानजीक महार्गावरील हॉटेलमध्ये मंगळवारी सकाळी एक पत्र आले. ते पत्र पाहून हॉटेलमध्ये कल्ला उडाला. सातारा शहर पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.