Meghalaya Ranji Team News: मेघालयच्या रणजी ट्रॉफी संघातील खेळाडूंना निलंबित करून त्यांच्या जागी नवीन संघ आणण्यात आला आहे. सर्वोच्च परिषद आणि मंडळाचे अध्यक्ष जेम्स संगमा यांच्यात वाद निर्माण झाला होता. अरुणाचल प्रदेशनंतर आता मेघालय क्रिकेट संघही क्रिकेट बोर्डातील अंतर्गत वादाचा बळी ठरला आहे. नागालँडविरुद्धच्या रणजी ट्रॉफी प्लेट ग्रुप सामन्याच्या अवघ्या एक दिवस आधी संपूर्ण संघाला निलंबित करून त्यांच्या जागी नवीन संघ आणण्यात आल्याचे वृत्त आहे.