नवी दिल्ली : मतदारयादीच्या विशेष सखोल पडताळणी (एसआयआर) दरम्यान मतदारांचे मसुदा यादीत नाव नसल्यास ‘फॉर्म-६’ भरावा लागेल. निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रक जारी करून. निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रक जारी करून याबाबतचा भ्रम दूर केला आहे. हा फॉर्म भरून मतदार आपले नाव पुन्हा नोंदवू शकतील, असे आयोगाने म्हटले आहे. .आधीपासून मतदार असूनही ‘फॉर्म-६’ भरणे ही चुकीची किंवा खोटी घोषणा मानली जाणार नाही. तसेच, त्यांच्यावर यासाठी कोणतीही कायदेशीर कारवाई होणार नाही.