कडा : आष्टी शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या श्रेग्रेरी घाटात काळाने एका तरुण चालकावर घाला घातला. ऊस वाहतूक करणारा ट्रक तब्बल ५०० ते ६०० फूट खोल द. ऊस वाहतूक करणारा ट्रक तब्बल ५०० ते ६०० फूट खोल दरीत कोसळून पेटल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी (दि.३ नोव्हेंबर) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात २३ वर्षीय चालक सागर सोमनाथ इंदलकर (रा.ब्रह्मगाव) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.