खेड : राज्यातील अनेक भागांना पाणीटंचाईच्या झळा बसत असताना रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या लोटे औद्योगिक वसाहतीत मात्र लाखो लिटर पाण्याची नासाडी झाल. औद्योगिक वसाहतीतील पाण्याची पाइपलाइन फुटल्याने अठरा तासांहून अधिक काळ पाणीगळती सुरू होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले असून, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे..