पुणे महापालिकेच्या आवारात किंवा कार्यालयात कोणत्याही प्रकारचे गिफ्ट स्वीकारण्यास महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सक्त मनाई केली आहे. पुणे : सध्या सर्वत्र दिवाळीची (Diwali) लगबग असून कंपन्यांतील कामगार, कर्मचाऱ्यांना बोनस आणि गिफ्ट काय मिळतं, याची उत्सुकता लागली आहे. दुसरीकडे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा फुलल्या आहेत. तर, काही राजकीय, सामाजिक संघटनांकडूनही दिवाळी फराळ किंवा किट वाटप केले जात असल्याचं पाहायला मिळत आहे.