Satara District Bank Election Result 2026: 21 जागांपैकी भाजपने 9 जागा जिंकत सर्वाधिक जागांवर वर्चस्व मिळवलं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने 8 आणि शिवसेनेने 4 जागांवर बाजी मारली आहे. शेतकऱ्यांची बँक आणि जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील सत्तेचं महत्त्वाचं केंद्र! याच बँकेच्या निवडणुकीसाठी गेल्या 4 महिन्यांपासून जिल्ह्यात जोरदार राजकीय हालचाली सुरू होत्या. मंत्री, आमदार, खासदार आणि दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. ठराव आपल्या बाजूने वळवण्यासाठी मोठी राजकीय ताकद लावण्यात आली.