सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले की, तुम्ही एका जागेवर कायमचा कब्जा करू शकत नाही. शेतकरी, पत्रकार, मजूर आणि इतर आंदोलक कुठे जाणार? प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, एकाच ठिकाणी अनिश्चित काळासाठी धरणे आंदोलन करता येणार नाही. आंदोलन हे केवळ एका व्यक्तीसाठी नसून सर्वांसाठी आहे; रोजगार आणि व्यवसायाचा विचार करणेही महत्त्वाचे आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, कोणतीही संघटना निदर्शनांसाठी सार्वजनिक जागेवर अनिश्चित काळासाठी कब्जा करू शकत नाही.