मुरासू चक्रीवादळाने आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडक दिली, त्यावेळी वाऱ्याचा वेग ताशी 120 किमीपर्यंत पोहोचला होता. हजारो झाडे उन्मळून पडली आणि शेकडो विजेच्या खांबांचे नुकसान झाले. Cyclone Murasu: आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडकलेले मुरासू चक्रीवादळ तेलंगणाच्या दिशेने सरकले आहे. दिलासादायक बाब म्हणजे त्याची तीव्रता ताशी 100 किमीवरून ताशी 60 किमीपर्यंत कमी झाली आहे. चक्रीवादळाचा एक भाग अजूनही आंध्रच्या किनारपट्टीवरून जात असून, त्यामुळे विजयवाडासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे.