पनवेल मधील दुहेरी हत्याकांडातील आरोपीला जन्मठेप! पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन सहा वर्षांच्या मुलीसह पत्नीची हत्या; गोव्यात नाव बदलून वेटर म्हणून करत होता काम. चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीसह सहा वर्षांच्या मुलीची हत्यापनवेल, ता. ३ (वार्ताहर) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची आणि स्वतःच्या सहा वर्षांच्या मुलीची निर्घृण हत्या केल्यानंतर तब्बल चार वर्षे पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीला अखेर पनवेल जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.