भरत उबाळे : सकाळ वृत्तसेवाशहापूर, ता. ३ : शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील सत्तासंघर्ष उफाळून आला असून, सभापती नंदलाल डोहळे आणि उपसभापती शरद वेखंडे यांच्याविरोधात १८ पैकी १२ संचालकांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. कामकाज करताना विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप करीत या संचालकांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी १२ नोव्हेंबरला अविश्वास ठरावावर निर्णय घेण्यासाठी विशेष सभा घेण्याची नोटीस बजावली आहे.