भिवंडी, ता. ३ (बातमीदार) : शहरातील वाढत्या वायुप्रदूषणाला आळा घालण्यासाठी भिवंडी महापालिकेने कठोर भूमिका घेतली आहे. बांधकामांमुळे होणारी धूळ, राडारोड्याची अयोग्य विल्हेवाट, कचरा जाळणे आणि मोकळ्या जागांवर बेकायदेशीरपणे कचरा टाकण्यास प्रतिबंध करण्यासाठी महापालिकेने तीन टप्प्यांचा कृती आराखडा राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ''ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन'' (ग्राप) लागू करण्यात आला असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना प्रथम नोटीस, त्यानंतर दंड आणि गंभीर प्रकरणांत काम बंद करण्याचे आदेश दिले जाणार आहेत..