Rajapur Pachal Teacher Couple Locked House Theft राजापूर : गणपतीच्या सुट्टीत शिक्षक दाम्पत्य मूळ गावी गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने पाचल-विद्यानगर येथील. घरातील लोखंडी व लाकडी कपाटांसह तिजोरी फोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरीस नेण्यात आली. या घटनेमुळे पाचल परिसरात खळबळ उडाली आहे..पाचल येथील सरस्वती विद्या मंदिरमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या सन्नू पिरजादे आणि त्यांचे पती मुसाअल्ली गुलाब पिरजादे (वय ५६) हे तुळसवडे हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक आहेत.