उल्हासनगर, ता. ३ (वार्ताहर) : उल्हासनगरात तब्बल १,६२३ जीन्स चोरीला गेल्याची तक्रार देणारा कारखानदारच या कथित चोरीच्या कटाचा सूत्रधार निघाला आहे. खिडकी तोडून चोरी झाल्याचा बनाव रचत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न हिललाईन पोलिसांनी उधळून लावला. तांत्रिक तपासातून या प्रकरणाचा पर्दाफाश करत पोलिसांनी अंबरनाथमध्ये लपविलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे.उल्हासनगर कॅम्प पाचमधील प्रेमनगर टेकडी परिसरातील सह्याद्रीनगर येथे जीन्स पॅकिंग कारखान्यातून १,६२३ जीन्स चोरीला गेल्याच्या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे.