शहापूर, ता. ३ (वार्ताहर) : तालुक्यातील बिरवाडी ग्रामपंचायतीच्या १५व्या वित्तआयोगाच्या निधीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत तत्कालीन ग्रामसेवकावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी (ता. ५) शहापूर पंचायत समितीच्या आवारात बेमुदत उपोषणाचा इशारा बळीराज सेनेने दिला आहे. संघटनेचे शहापूर तालुका संपर्कप्रमुख दशरथ भोईर यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिले आहे. बिरवाडी ग्रामपंचायतीच्या तत्कालीन ग्रामसेवकाला गटविकास अधिकाऱ्यांनी बदली कारणास्तव कार्यमुक्त होण्याचे आदेश दिले होते.