वज्रेश्वरी, ता. ३ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील बौद्ध वस्त्यांमधील प्रलंबित समस्या जाणून घेऊन त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या ठाणे जिल्हा आणि भिवंडी तालुका पदाधिकाऱ्यांनी गावोगावी प्रत्यक्ष भेटी देण्यास सुरुवात केली आहे. या दौऱ्यात दिघाशी येथील समाजमंदिराचा प्रलंबित प्रश्न आणि आवळे गावातील पाणीसमस्येची दखल घेण्यात आली.दिघाशी येथील बौद्ध वस्तीत पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समाजमंदिराच्या प्रश्नावर ग्रामसेवक उदय गगे यांच्याशी सविस्तर चर्चा केली.