या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओनुसार काही लोक दोन्ही हेलिकॉप्टर लँड होण्याची वाट पाहात आहेत. आपला अपघात होऊ शकतो, हे लक्षात येताच दोन्ही हेलिकॉप्टरच्या पायलट अपघात टाळण्याचा प्रयत्न करत आहेत. Helicopter Accident : आजकाल विमान अपघातांचे प्रमाण खूपच वाढले आहे. खराब हवामान, तांत्रिक बिघाड, पायलटची चूक यामुळे अपघात होताना पाहायला मिळत आहेत. विमानासोबतच हेलिकॉप्टरचेही अलिकडेच काही भीषण अपघात झाले आहेत. यामुळे हवाई वाहतुकीच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातायत.