Prajakta Mali Post : प्राजक्ता माळीनं सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते आणि तिच्याविषयीचे अपडेट्स चाहत्यांना देते. अशातच आता प्राजक्तानं क्रांती रेडकरसाठी पोस्ट शेअर केली आहे. प्राजक्तानं क्रांती रेडकरच्या आगामी मैत्रेया चित्रपटाला शुभेच्छा देताना खास पोस्ट लिहिली आहे.