Neelam Shirke On Laxmikant Berde : मराठी अभिनेत्री नीलम शिर्केनं एका मुलाखतीत लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या शेवटच्या भेटीचा प्रसंग सांगितला आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या विनोदी अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यांच्या सहजसुंदर अभिनयामुळे आजही त्यांचे अनेक चित्रपट प्रेक्षक आवडीने पाहतात. मात्र, १६ डिसेंबर २००४ रोजी त्यांच्या निधनाची बातमी समोर आली आणि संपूर्ण मराठी मनोरंजनविश्वावर शोककळा पसरली.