#abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics पोलीस उपनिरीक्षक विभागीय मर्यादीत परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय. परीक्षेत सामूहिक कॉपी, आर्थिक देवाणघेवाण, ब्लॅकलिस्टमधील नावं वगळणं, शारीरिक चाचणीतील गैरव्यवहार, नियमबाह्य पद्धतीनं ताकीद देऊन गैरप्रकार करणाऱ्यांना पात्र ठरवणं असे प्रकार घडल्याचा आरोप केला जातोय. या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणीही न्यायिक चौकशी आयोगाचे सचिव तुकाराम मुंढे यांच्याकडे केल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय.