उमरखेड : पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याच्या बहुचर्चित प्रकरणाला पुन्हा नवे वळण मिळाले आहे. कारखान्याच्या तत्कालीन संचालक मंडळाला २०२३ मध्ये चौकशीत निर्. या प्रकरणात सहकार विभागाने तत्कालीन अध्यक्ष प्रकाश पाटील देवसरकर यांच्यासह २३ जणांना नोटिसा बजावल्या असून, ४ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे..वसंत सहकारी साखर कारखान्याच्या कारभारासंदर्भात महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ८३ अन्वये चौकशी करण्यात आली होती. तत्कालीन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या कार्यकाळात या चौकशीला सुरुवात झाली.