Mumbai Crime News : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विशेष कार्य अधिकारी असल्याचे भासवून कंत्राटदाराची तब्बल 3.25 कोटी रुपयांची फसवणूक (Crime News) केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपासाचे चक्र गतिमान करत छत्रपती संभाजीनगर येथील 40 वर्षीय आसिफ इस्माईल पठाणला मरीन ड्राइव्ह पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपीने कंत्राटदाराच्या 50 कोटी रुपयांच्या प्रलंबित PWD बिलांना मंजुरी मिळवून देण्याचे आमिष दाखवल्याची माहिती आहे.