Sangli District Central Cooperative Bank election : सांगली जिल्हा बँकेच्या मतमोजणी केंद्राच्या परिसरात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांकडून गुलालाची उधळण करत जल्लोष करण्यास सुरुवात झाली आहे. सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत 6 जागांची मतमोजणी प्रक्रिया मिरजेतील मार्केट यार्ड मध्ये सुरू आहे. आठ टेबल वर 25 कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही मतमोजणी होत आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत 15 जागा बिनविरोध झाल्यानंतर उरलेल्या सहा जागांसाठी 13 उमेदवार (Sangli News) मैदानात होते.