Rain Update: राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील 4 ते 5 दिवस वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले 'मुरासू' हे चक्रीवादळ तीव्र वेगाने किनारपट्टीच्या दिशेने सरकत असून त्याचे रूपांतर अत्यंत भीषण चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. या वादळाचा थेट आणि मुख्य फटका आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला बसणार आहे.