Pune Metro Phase 2 : चार मार्गांची एकूण लांबी ४४.३९ किलोमीटर असून, ४१ स्थानके प्रस्तावित आहेत. पुणे : पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात चार मार्गिकांच्या माध्यमातून शहराच्या पूर्व, पश्चिम आणि नैर्ऋत्य भागांपर्यंत मेट्रोचे जाळे विस्तारण्यात येणार आहे. वनाज–चांदणी चौक, रामवाडी–वाघोली/विठ्ठलवाडी, खराडी–खडकवासला आणि नळस्टॉप–वारजे–माणिकबाग या मार्गांचा त्यात समावेश आहे. पहिल्या टप्प्यातील कार्यरत मार्गांना नव्या मार्गांची जोड मिळाल्यानंतर शहरातील निवासी, व्यापारी आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रांदरम्यान सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय अधिक व्यापक होणार आहे.