रत्नागिरी : दिवाळी सण काहीच दिवसांवर येवून ठेपला असून दिवाळीसाठी रत्नागिरी विभागाच्या वतीने तब्बल ६५० एसटी बसेसचे नियोजन केले आहे. ६ नोव्हेंबरपासून एसटी बस. ६ नोव्हेंबरपासून एसटी बसेस पश्चिम महाराष्ट्रासह मुंबई, पुणे येथे बसेस धावणार आहेत. यानिमित्त दिवाळीसाठी रत्नागिरी विभाग सज्ज झाला आहे. .नोकरीनिमित्त इतर जिल्ह्यातील चाकरमानी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात आले आहेत. दिवाळीसणानिमित्त प्रत्येकजण आपल्या मूळ गावी हमखास जातोच. येत्या ५ नोव्हेंबरपासून शाळा-महाविद्यालयांना दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होणार आहेत.