सातारा : सातारा जिल्हा न्यायालय बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा ई-मेल आल्यानंतर शहर हादरून गेले. पोलिसांनी तत्काळ बॉम्बशोधक पथकासह चार तास संपूर्ण न्यायालय. मात्र बॉम्बसदृश कोणतीही वस्तू सापडली नसल्याने खोटी धमकी दिल्याचे समोर आले आहे..सोमवारी सकाळी नियमित वेळेत न्यायालयाचे कामकाज सुरू झाले होते. न्यायाधीश, वकील मंडळी, प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, पक्षकार न्यायालयात आले होते. अशातच सकाळी ११.३० च्या सुमारास पंजाबी भाषेशी साधर्म्य असलेल्या भाषेत न्यायालय प्रशासनाला एक ई-मेल आला.