Payal Zambre Case: पुण्यातून पुन्हा एकदा धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका प्रसिद्ध उद्योगपत्याच्या आयटी इंजिनिअर सुनेने टोकाचे पाऊल उचलले आहे. 29 वर्षीय महिलेच्या या निर्णयामुळे पुण्यात पुन्हा खळबळ माजली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातून अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. आता मुकंदनगर परिसरात राहणाऱ्या 29 वर्षीय महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलले आहे. तिने राहत्या घरात स्वत:ला संपवले आहे. या प्रकरणामुळे पुण्यात खळबळ माजली आहे.