Indian Navy : भारतीय नौदलाने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. मुंबईच्या किनाऱ्यापासून 3000 किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रात एकदम आतमध्ये स्पेशल ऑपरेशन केलय. त्यासाठी इंडियन एअर फोर्सची सुद्धा मदत घेण्यात आली. भारतीय नौदलाने अरबी समुद्रात एक स्पेशल रेस्क्यू ऑपरेशन केलं आहे. 'अजिनी' या इराणच्या मच्छीमारी जहाजाचं समुद्री डाकूंनी अपहरण केलं होतं. भारतीय नौदलाने समुद्री डाकूंच्या तावडीतून या जहाजाची सुटका करत सर्व 20 क्रू मेंबर्सची सुरक्षित सुटका केली.