ईश्वरपूर : साखरेचे वाढलेले दर, दुष्काळी परिस्थिती आणि उसाची घटलेली उपलब्धता या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यांनी उसाला प्रतिटन पाच हजार रुपये दर मिळालाच पाहिजे. श. शेतकऱ्यांच्या हक्काच्या मागण्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने कारखानदारांची बैठक घेऊन ऊसदराचा प्रश्न मार्गी लावावा, या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेच्यावतीने गुरुवार, दि. ५ नोव्हेंबररोजी सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली..