ईश्वरपूर : प्रेमविवाह मोडल्याच्या जुन्या वादातून दोघांनी युवकाच्या डोक्यात कोयत्याने वार करून, छातीत चाकूने भोसकून निर्घृण खून केला. सूरज महादेव कांबळे (३१, रा. आंबेडकरनगर, ईश्वरपूर) असे मृताचे नाव आहे. येथील कामेरी नाका परिसरात रविवारी (दि.१) रात्री ११.४५ वाजता ही घटना घडली..संशयित अंकित मुकुंद कांबळे (३१) आणि साहिल अनिल कांबळे (२९, दोघे रा. आंबेडकरनगर, ईश्वरपूर) यांना पोलिसांनी अटक केली. सूरज याचा चुलतभाऊ आप्पासाहेब कांबळे यांनी फिर्याद दिली आहे..