सांगली : शहरातील महावीर उद्यानातून चंदन चोरट्यांनी चंदनाची दोन झाडे तोडून लंपास केली. ही घटना रविवारी रात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी चोरीला विर. यावेळी चोरीला विरोध करणाऱ्या सुरक्षा रक्षकावर चोरट्यांनी कटरने प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात नोंद आहे..महावीर उद्यानात रविवारी रात्री उद्यानाचे सुरक्षा कर्मचारी राजेंद्र मनगणे यांना झुडपांमध्ये संशयास्पद हालचाली जाणवल्या. त्यांनी पाहणी केली असता तीन चोरटे चंदनाचे ओंडके लपवताना दिसून आले.