जयसिंगपूर : खेळताना खणीकडे गेलेल्या ईश्वर कोमल कांबळे (वय ७, रा. लक्ष्मी नगर, धरणगुत्ती, जयसिंगपूर) या मुलाचा गोळीबार खणीत पडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सका. याबाबतची वर्दी रमेश शिवलिंग कांबळे यांनी शिरोळ पोलिसांत दिली . .याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, ईश्वर हा दुसरीच्या वर्गात शिकत होता. तो सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास मित्रांसोबत खेळण्यासाठी गेला होता. यावेळी जयसिंगपूर शहरालगत असलेल्या धरणगुत्ती हद्दीतील गोळीबार खणीतील पाण्यात ईश्वर पडला.