मेयो परिसरात खासगी रुग्णावाहिका चालविणाऱ्या दोन गटात आज तुफान राडा झाला. लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेयो परिसरात खासगी रुग्णावाहिका चालविणाऱ्या दोन गटात आज तुफान राडा झाला. दुपारी एकमेकांना मारहाण केल्यानंतर रात्री त्यांनी तीन अँबुलन्सची तोडफोड केली. या प्रकारामुळे रात्री मेयो समोरच्या परिसरात तणाव निर्माण झाला होता.मेयो रुग्णालयात रोज ठिकठिकाणांहून मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात. या रुग्णांची दिशाभूल करून त्यांना खासगी रुग्णालयात पोहचविणारे रॅकेट अनेक वर्षांपासून मेयो, मेडिकल परिसरात सक्रिय आहे.