नवी दिल्ली : प्रसिद्ध उद्योजक सुभाष चंद्रा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांच्याविरोधात मनी लाँडरिंगचा. एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडची (एलआयसीएचएफएल) १,३२२ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याच्या आरोपांशी हे प्रकरण संबंधित आहे. .केंद्रीय तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) तपास सुरू केला आहे.