कोरड्या दुष्काळामुळे खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला आहे. राज्याच्या ३३ जिल्ह्यांतील ३०४ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला असून, आतापर्यंत ३७,५२८ गावांमध्ये पंचनाम्याचे काम पूर्ण झाले आहे. राज्यात १ नोव्हेंबरपर्यंत ९७ टक्के कृषी क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले. दुष्काळात १४१.५३ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, १५,३८६.१९ कोटींचा प्रस्ताव राज्याकडून केंद्र सरकारकडे सादर करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.