नवी दिल्ली : दिवाळीच्या सणासुदीच्या काळात विमान तिकिटांच्या दरात प्रचंड वाढ होत असल्याचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात उपस्थित करण्यात आला. सामान्य दिवसांच्या तुलन. सामान्य दिवसांच्या तुलनेत विमान भाड्यात ७०० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचा दावा याचिकाकर्त्याच्या वकिलांनी केला. मात्र, या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला. ‘तिकीट महाग वाटत असेल तर विमान प्रवास करू नका’, अशी टिप्पणी न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी केली. .