अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 291 कोटी 91 लाख रुपयांची मदत मंजूर केली आहे. मुंबई - जून ते ऑगस्ट 2026 या काळात अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 291 कोटी 91 लाख रुपयांची मदत मंजूर केली आहे. यामध्ये पीक नुकसानीसाठी 262 कोटी 69 लाख रुपये, तर शेतजमिनीच्या नुकसानीसाठी 29 कोटी 21 लाख रुपयांचा समावेश आहे.