मोबईच रिचार्ज म्हटलं की दर महिन्याला पैसे खर्च करावे लागतात. त्यात रिचार्जचे दर वाढले की ग्राहकांचं बजेटही कोलमडलं. पण आता जिओच्या एका स्वस्त रिचार्ज प्लॅनची चर्चा सुरू आहे. कारण या प्लॅनमध्ये एकदा रिचार्ज केला की थेट वर्षभराची वैधता मिळते. विशेष म्हणजे, महिन्याचा हिशोब केला तर खर्च अवघा 84 रूपये होतो. त्यामुळे वारंवार रिचार्ज करण्याचा त्रासही वाचतो. वर्षभराची वैधता असलेला प्लॅन : जिओचा हा प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह येतो.