Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन बुलेटप्रूफ काचेमागे उभे राहून चाहत्यांना भेटले असून यावर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रविवारी अमिताभ बच्चन बुलेटप्रूफ काचेमागे उभे राहून चाहत्यांना भेटले. जुहूमध्ये अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर जवळपास दोन आठवड्यांनी हे घडलं आहे. या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीनं घेतलेली. यावर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवरून केंद्र सरकारवर टीका केली.