60 च्या दशकातील अजरामर प्रेमगीत. ज्यात मांडण्यात आली आहे प्रेमाची सुंदर भावना. आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांचा सुरेल आवाजामुळे आजही हे गाणं सुपरहिट. जुन्या हिंदी चित्रपटसृष्टीतील रोमँटिक गाण्यांचा विषय निघाला की 1960च्या दशकातील अनेक अजरामर गाण्यांची आठवण होते. याच काळातील एक सुंदर आणि हळुवार प्रेमगीत म्हणजे ‘मैंने एक ख्वाब सा देखा है’. या गाण्यातील ‘मैंने देखा है कि फूलों से लदी शाखों में’ ही ओळ आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.