Marathi Actress : प्रसिद्ध मराठी अभिनेत्री वयाच्या 34व्या वर्षी सिंगल असून तिनं लग्नाबद्दल भाष्य केलं आहे. मराठी अभिनेत्री वैदेही परशुरामीचं वय 34 वर्ष असून अद्याप अभिनेत्रीनं लग्न केलेलं नाही. वैदेहीनं नुकत्याच एका मुलाखतीत लग्नाबद्दल भाष्य केलं आहे. वैदेही म्हणाली की, 'मी अनेकदा प्रेमात पडली आहे. लोकांना विश्वास बसत नाही, पण मी 'जब वी मेट'मधली गीत आहे. मला लहानपणापासूच लग्न करायची इच्छा होती. फक्त ते काही कारणानं अजून होऊ शकलेलं नाही.