Cyclone Murasu impact on Maharashtra Weather: बंगालच्या उपसागरातील अर्णब चक्रीवादळानंतर आता मुरासू चक्रीवादळाची रविवारी म्हणजेच १ नोव्हेंबर रोजी निर्मिती झाली आ. राज्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी हजेरी लावत आहेत. सोमवारी म्हणजेच २ नोव्हेंबर कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही भागात पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे..सोमवारी पुणे जिल्ह्यांत जोरदार पावसाचा तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, कोल्हापूर घाटमाथा, सातारा घाटमाथा, पुणे घाटमाथा, अहिल्यानगर, कोल्हापूर, सांगली, सातारा, लातूर, धाराशिव जिल्ह्यांत गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे.