Amravati Court Bomb Threat: भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने न्यायाधीश, वकील, पक्षकार आणि सर्वसामान्य मंडळी तातडीने न्यायालयाच्या बाहेर पडली. Amravati Court Bomb Threat | प्रदीप भाकरे, अमरावती : एका अज्ञात ईमेलने अमरावती पोलिसांची झोप उडवली. 'अमरावतीचे जिल्हा व सत्र न्यायालय बॉम्बने उडवून देऊ,' अशी थेट धमकी ईमेलद्वारे मिळाल्याने संपूर्ण शहर व ग्रामीण पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली. या कथित धमकीच्या ईमेलमुळे न्यायाधीश आणि वकील बांधवांमध्ये देखील मोठी घबराहट पाहायला मिळाली.