अमरावती : अमरावती जिल्हा सत्र न्यायालयात आज दुपारी एक धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली. प्राप्त माहितीनुसार, २ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजून २ म. या धमकीनंतर तत्काळ अमरावती पोलीस प्रशासनाला माहिती देण्यात आली..परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त मोठ्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षेचा उपाय म्हणून संपूर्ण कोर्ट परिसर पूर्णपणे खाली करण्यात आला असून न्यायाधीश, वकील आणि नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.