Gokul Chairman Election : गोकुळ अध्यक्ष निवडीच्या याचिकेवर आज (दि. २ नोव्हेंबर) मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सुनावणी झाली. अध्यक्ष निवडीस. अध्यक्ष निवडीसाठी येत्या 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता सभा घेण्याचे आदेश न्यायमूर्ती अभय आहुजा आणि न्यायमूर्ती धीरज धोटे यांच्या खंडपीठाने दिले. तसेच निवडून आलेल्या केवळ 25 संचालकांना सभेसाठी उपस्थित राहण्यासंदर्भात नोटीस पाठविण्याचे आदेशही खंडपीठाने दिले आहेत. .