हे सगळे चित्र एकीकडे असताना ठाणेकरांच्या मनात निर्माण झालेले भीतीचे व अस्वस्थतेचे वातावरण दूर करण्याची जबाबदारी ठाण्यातील राजकीय नेत्यांची आहे. -अतुल कुलकर्णी (संपादक, मुंबई)गेला आठवडा ठाण्यातल्या मोर्चांनी गाजला. प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणानंतर ठाण्यात एक प्रकारची अस्वस्थता आहे. त्याआधी घडलेल्या वेगवेगळ्या घटनांबद्दल ठाणेकर बोलत नसले तरी ते अस्वस्थ होते. कारण अशा अनेक घटना घडल्या होत्या. पोलिस उपनिरीक्षक किसन भोईर यांच्या डोक्यात वीट फेकून मारली. कापूरबावडी परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहात राजू नावाच्या व्यक्तीची हत्या झाली.