Nagpur News : दिवाळीपूर्वी शहरातील ८ ते १० सराफा व्यापाऱ्यांना लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकीची पत्रे पाठवण्यात आली आहेत. प्रत्येकाकडे १० लाखांची खंडणी मागण्यात आली असून, पैसे न दिल्यास गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली असून पोलिसांचा तपास सुरू आहे. प्रत्येक व्यापाऱ्याकडे १० लाख रुपयांची मागणी करण्यात आली असून, पैसे न दिल्यास गोळ्या घालून ठार मारण्यासह गंभीर स्वरूपाच्या हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे.