Nagpur News : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागपूरला येणाऱ्या प्रवाशांना महागाईचा फटका बसत आहे. विमान तिकिटांचे दर १७ हजार ७९९ रुपयांपर्यंत, तर खासगी बसचे भाडे पाच हजारांपर्यंत पोहोचले आहे. रेल्वे आरक्षण फुल्ल झाल्याने प्रवाशांसमोर महागड्या प्रवासाचा पर्याय उरला आहे. दिवाळीचा सण जवळ येताच घरापासून दूर राहणाऱ्या नागरिकांची गावी परतण्याची लगबग सुरू झाली आहे.