नाशिक : सिंहस्थ ध्वजारोहण, राष्ट्रपतींचा दौरा आणि गोदाआरती यांसारखे महत्त्वाचे व्हीव्हीआयपी. १ नोव्हेंबर) नाशिकच्या बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली. गेल्या दोन दिवसांपासून निर्बंधांमुळे काहीसा शुकशुकाट असलेल्या शहरातील प्रमुख रस्त्यांवर रविवारी वाहनांची अक्षरशः गर्दी झाली. परिणामी रविवार कारंजा, मेनरोड, शालिमार आणि एमजी रोड परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांनी कुटुंबासह बाजारपेठांकडे धाव घेतल्याने मध्यवर्ती नाशिक शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली.